निघून गेलीस जरी तू , मी वाट पाहणार नाही,
हाक देण्यासाठी देखिल ,मागे वळून पाहणार नाही.
करील प्रयत्न अतोनात ,विसरून जाण्याचे तुला,
पण वचन माझे तुला ,कधी निघून जाण्यास अडवणार नाही,
सांभाळून ठेव मनात तुझ्या , माझ्या प्रेम खुणांची मूळ प्रत ,
लक्ष्यात ठेव ,ओघळून पडलेल्या पर्णाचेही बनते उपयुक्त जैविक खत.
माझे दार सदैव उघडे राहणारच आहे तुझ्या साठी,
नाही बनू दिलेस घर तुझे जरी , राहील मी नेहमीच तुझे छत .
पण काय करू ?……
कितीही झाडून साफ केली स्वप्नांची माती पापण्यांनी ,
परत येते ती पुन्हा पुन्हा फक्त तुझ्या स्पर्शांचा स्मरणांनी.
काढून ठेवले जरी मी सगळे तुझे विचार माझ्या मनातून ,
कशी थांबवू तुझी आठवण जी येते सतत चाललेल्या श्वासांनी.
कवितेतून काव्य आणि काव्यातून मन ,मोहर आल्याप्रमाणे स्फुरतंच,
कुंपण घातले तरी, ते तोडून मन तुझी आठवण काढतंच.
कितीही जमीन असो माळरान,तरी त्यात पाणी मात्र मुरतंच,
बंधन सुटले ,नाते तुटले ,तरी प्रेम मात्र उरतंच
- ऋत्विज पाठक

No comments:
Post a Comment